जळगाव : बारावी परीक्षेच्या निकालाबाबत गेल्या काही दिवसांपासून उत्सुकता लागली होती. अखेर आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल जाहीर केला असून जळगाव जिल्ह्याचा बारावीचा निकाल 93.17 टक्के लागला आहे.
बारावीच्या परीक्षेच्या निकाल दुपारी 2 वाजता जाहीर करण्यात आला आहे. नाशिक विभागातून जळगाव जिल्ह्याच्या बारावीचा 93.17 टक्के निकाल लागला आहे. जळगाव जिल्ह्यात 44 हजार 324 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 44 हजार 69 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 41 हजार 62 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यातील 4 हजार 202 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. प्रथम श्रेणीत 17 हजार 133 द्वितीय श्रेणीत 16 हजार 571 तर 3 हजार 156 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
Discussion about this post