मुंबई । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली असून या बैठकीत अनेक मोठे आणि महत्वाचे निर्णय घेण्यात आले. ज्यामध्ये राज्यातील कॅसिनो कायदा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. तसेच आगामी गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने घेतला. त्यामुळे लाखो गोरगरीबांना ऐन सणासुदीत दिलासा मिळणार आहे
त्याचबरोबर राज्यातील १७ जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे आता मुख्य रस्त्याने जोडण्या संदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णय ही या बैठकीत घेण्यात आला. एकूण ५ हजार कोटींचा प्रस्ताव या कामासाठी मांडण्यात आला आहे. त्याचबरोबर आयटीआयमधील शिल्प कारागीर प्रशिक्षणार्थींना विद्यावेतनात भरीव वाढ देण्यात येणार आहे. या निर्णयानुसार ५०० रुपये मिळणार आहेत.
मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय..
राज्यातील १७ जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे आता मुख्य रस्त्याने जोडणार.
५ हजार कोटींच्या प्रस्तावानुसार भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबविणार.
गौरी- गणपती तसेच दिवाळीसाठी १०० रुपयात आनंदाचा शिधा मिळणार. ज्यामध्ये प्रत्येकी एक किलोचा रवा, चणाडाळ, साखर, खाद्यतेलाचा समावेश असेल.
आयटीआयमधील शिल्प कारागीर प्रशिक्षणार्थींना विद्यावेतनात भरीव वाढ करण्यात आली आहे. या निर्णानुसार आता दरमहा ५०० रुपये मिळणार आहेत.
मुंबई प्रेस क्लबला फोर्ट येथे पुनर्विकासासाठी परवानगी देण्यात आली.
पावसाळी अधिवेशनात चर्चेत आलेला महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द करण्याचा निर्णय.
केंद्र सरकारच्या सूचनांप्रमाणे राज्यात पोषण अभियान कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. सुधारित निर्णयात राज्याचा हिस्सा वाढला.
सहकारी संस्था आणि सभासदांबाबतचा २०२३ चा अध्यादेश मागे घेण्यात आला.
दुय्यम न्यायालयातील निवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन.
मंडणगड येथे दिवाणी न्यायालय होणार
Discussion about this post