नवी दिल्ली । यंदाच्या अर्थसंकल्पात देण्यात आलेल्या भरघोस निधीमुळे महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांना चांगली गती प्राप्त होणार आहे. अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पाला १५ हजार ९४० कोटींचा निधी देण्यात आला असून त्यात भुसावळ विभागातील विविध कामांसाठी ८५५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मंगळवार, २३ जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये भारतीय रेल्वेसाठी २,६२,२०० अटींची भांडवली गुंतवणुकीची तरतूद केली. या पहिल्या अर्थसंकल्पावर बुधवारी पत्रकार परिषदेत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पाला १५ हजार ९४० कोटींचा निधी देण्यात आल्याची माहिती दिली. त्यात भुसावळ विभागातील विविध कामांसाठी ८५५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
भुसावळ विभागातील ही कामे होणार
पाचोरा-जामनेर (८४ किमी) – ३०० कोटी रुपये
जळगाव-भुसावळ 4th लाईन (24 किमी) – 40 कोटी रुपये
भुसावळ – बदनेरा साइड ट्रेनसाठी वेगळी अप आणि डाउन मुख्य लाईन, अप दिशेने अतिरिक्त द्वीप प्लेटफार्म – 11 कोटी रुपये
मनमाड-जळगाव 3rd लाईन (160 किमी) – 120 कोटी रुपये
नवीन लाईन्स :धुळे (बोरविहीर) – नरडाणा (50.6 किमी) – 350 कोटी रुपये
गेज रूपांतरण – 300 कोटी रुपये
पाचोरा-जामनेर (84 किमी) – 300 कोटी रुपये
दुहेरिकरण / 3rd लाईन / 4th लाईन -:
मनमाड-जळगाव 3rd लाईन (160 किमी) – 120 कोटी रुपये
जळगाव-भुसावळ 4th लाईन (24 किमी) – 40 कोटी रुपये
वाहतूक सुविधा आणि इतर कामे
गायगाव – लांब हॉल ट्रेनच्या हाताळणीसाठी यार्ड पुनः संरचना – 4.25 कोटी रुपये
भुसावळ – बडनेरा साइड ट्रेनसाठी वेगळी अप आणि डाउन मुख्य लाईन, अप दिशेने अतिरिक्त द्वीप प्लेटफार्म – ११ कोटी रुपये
*रस्ते सुरक्षा कामे – निफाड आरओबी















Discussion about this post