मुंबई । भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाचे पडसाद आता थेट राज्य प्रशासनात उमटताना दिसत आहेत. तपासादरम्यान काही सरकारी अधिकाऱ्यांचेही या प्रकरणाशी संबंध असल्याचे समोर आल्यानंतर प्रशासनाने मोठी हालचाल करत तब्बल ८ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. राज्य प्रशासनातील जिल्हाधिकारी आणि आयुक्त पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये रुबल अग्रवाल ते नयना गुंडे यांच्या नावाचा समावेश आहे.
कोणाची कुठे नियुक्ती?
एम. देवेंद्र सिंग (२०११) यांची बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई येथे सहआयुक्त म्हणून बदली
डॉ. मैनक घोष (२०१९), जिल्हा परिषद, धाराशिव, यांची सांगली येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झालीये
प्रियंवदा म्हाड्डळकर (२०२२) यांची जिल्हा परिषद, धाराशिव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली
अशोक काकडे (२०१०), जिल्हाधिकारी, सांगली यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ (एमएआयडीसी), मुंबई म्हणून नियुक्ती
राहुल रेखवार (२०११) यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई येथे सदस्य सचिव म्हणून बदली
श्वेता सिंघल (२००९), विभागीय आयुक्त, अमरावती विभाग, अमरावती यांची व्यवस्थापकीय संचालक, महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई म्हणून नियुक्ती
रुबल प्रखेर अग्रवाल (२००८), व्यवस्थापकीय संचालक, महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई यांची विभागीय आयुक्त, कोकण विभाग, मुंबई म्हणून नियुक्ती
नयना गुंडे (२००८), महिला व बाल आयुक्त, पुणे यांची विभागीय आयुक्त, अमरावती विभाग, अमरावती म्हणून बदली झालीये.
तत्पूर्वी, अशोक खरातशी संबंध असल्याचे उघड झाल्यानंतर उपजिल्हाधिकारी भांडे पाटील अडचणीत आले. त्यानंतर त्यांची तातडीने बदली करण्यात आली. मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील (SRA) उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील यांची प्रतिनियुक्ती रद्द करण्यात आली. त्यानंतर त्यांना मंत्रालयातील महसूल व वन विभागात तात्काळ रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले.















Discussion about this post