पुणे । पुणे महानगरपालिका निवडणुकीत पक्षाच्याविरोधात जाऊन निवडणुका लढवल्याप्रकरणी भाजपने ६९ कार्यकर्त्यांना निलंबित केले आहे. भाजपच्या विरोधात जाऊन निवडणूक लढवणाऱ्या कार्यकर्यांना सहा वर्षासाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
पुणे महानगरपालिका निवडणुकीत पक्षाच्या विरोधात जाऊन निवडणुका लढवणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांविरोधात भाजपने मोठी कारवाई केली. ६९ पदाधिकाऱ्यांचे भाजपने निलंबन केले. यातील अनेक कार्यकर्ते माजी नगरसेवक भाजपचे पदाधिकारी राहिलेले आहेत. अमोल बालवडकर,धनंजय जाधव, किरण बारटक्के सचिन दांगट मोहिनी देवकर उज्वला गौड हरीश परदेशी प्रीतम नागापुरे संगीता ठोसर संदीप लोणकर मधुकर मुसळे यांच्यासह ६९ जणांचे निलंबन केले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानंतर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पक्षशिस्त भंग करणाऱ्यांबाबत कोणतीही सहानुभूती न दाखवण्याचा निर्धार पक्षाने स्पष्ट केला आहे. पक्षातील कुठल्याही पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याने पक्षविरोधी भूमिका घेतल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल, अशा सूचनाही पक्षाकडून केल्या आहेत. भाजपकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अनेक पदाधिकाऱ्यांना धक्का बसला आहे.















Discussion about this post