नवी दिल्ली । सोशल मीडियावर आणि विशेषतः व्हॉट्सअॅपवर सध्या एक मेसेज व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मार्च २०२६ पर्यंत ५०० रुपयांच्या नोटांवर बंदी घालणार आहे. तसेच आरबीआय सप्टेंबर 2025 पर्यंत एटीएममधून 500 रुपयांच्या नोटेचं वितरण बंद करण्याबाबत निर्देश दिल्याचा दावाही सोशल मीडियावरील व्हायरल मेसेज करण्यात येत आहे. यामुळं अनेक जणांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र आरबीआयनं अशा प्रकारचं कोणतंही नोटीस काढलेलं नाही किंवा निर्देश दिलेले नाहीत. फॅक्टचेकमध्ये हा दावा चुकीचा असल्याचं समोर आलं आहे.
व्हायरल मेसेजमध्ये काय?
व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये आरबीआयकडून सर्व बँकांना 30 सप्टेंबर 2025 पर्यंत एटीएममधून 500 रुपयांच्या नोटा देणं बंद करण्यास सांगितल्याचा दावा केला जात होता. 75 टक्के बँकांच्या एटीएममधून 31 मार्च 2026 पर्यंत 90 टक्के एटीएममधून 500 रुपयांच्या नोटा बंद होतील. एटीएम 200 आणि 100 रुपयांच्या नोटा मिळतील. यासाठी 500 रुपयांच्या नोटांचा आतापासून वापर करा असा संदेश व्हायरल मेसेजमध्ये देण्यात आला.
पीआयबी फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
पीआयबी फॅक्ट चेकमध्ये व्हायरल मेसेज पूर्णपणे खोटा असल्याचं सांगण्यात आलं आहे. पीआयबी फॅक्ट चेकनं सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये आरबीआयकडून असा कोणताही आदेश दिला नसल्याचं सांगण्यात आलं आहे. 500 रुपयांची नोट अजून लीगल टेंडर आहे असं सांगण्यातआलं आहे. त्यामुळं 500 रुपयांच्या नोटांचा वापर कायदेशीर असल्याचं सांगण्यात आलं आहे.
Discussion about this post