नवी दिल्ली । सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर असून बँकांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पगारात वार्षिक १७ टक्के वाढ होणार आहे. ८ मार्च रोजी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन आणि इंडियन बँक असोसिएशनच्या प्रतिनिधींनी या करारावर अंतिम स्वाक्षऱ्या केल्यात. या निर्णयाचा फायदा सुमारे 8 लाख बँक कर्मचाऱ्यांना होणार आहे.
सोबतच पगारवाढीसह यामध्ये ५ दिवसांचा आठवडा करण्यावर देखील चर्चा झालीये.गेल्या अनेक दिवसांपासून हा करार रखडलेला होता. अशात काल यावर अंतिम स्वाक्षऱ्या झाल्यात. या करारामध्ये १२ सार्वजनिक क्षेत्रातील बँकांयासह १० खाजगी बँका आणि 3 विदेशी बँकांचा समावेश आहे. अशा एकूण १५ बँकांमधील ७ लाख बँक कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. पगारवाढीसह यामध्ये ५ दिवसांचा आठवडा करण्यावर देखील चर्चा झालीये.
सदर करारामुळे जवळपास 7 कर्मचाऱ्यांना पगार वाढीचा लाभ होणार आहे. बँक कर्मचारी अनेक दिवसांपासून पगारवाढीची मागणी करत होते. आता ही मागणी पूर्ण झाली आहे. कर्मचाऱ्यांनी या करारात ५ दिवसांच्या आठवड्याची देखील मागणी केली होती. या मागणीला तत्त्वतः मान्यता मिळाली आहे. आतापर्यंत बँकेतील कर्मचाऱ्यांना दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवार सुट्टी होती. ही सुट्टी आता सर्व आठवड्यांना मिळार आहे.
सदर करार निर्णय सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. यावर पुढील सहा महिन्यांच्या आत निर्णय घेण्यात येणार आहे. सुट्ट्या आणि पगारवाढीबाबत बँकिंग संघटनांची आयबीएशी दीर्घकाळ चर्चा सुरू होती. बरेच दिवस चर्चा केल्यानंतर शुक्रवारी या मागण्या मान्य करत त्यावर सामंजस्य करार करण्यात आलाय.
कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीमुळे बँकांच्या व्यवस्थापकांना दरवर्षी १२ हजार ४४९ कोटींचा अतिरिक्त भार सहन करावा लागणार आहे. सदर करार हा ऑक्टोबर २०२७ पर्यंत लागू असेल. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा विचार देखील या करारात करण्यात आला आहे.
Discussion about this post