नवी दिल्ली । संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभेतून पुन्हा एकदा ४९ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचाही समावेश आहे.
खरंतर, संसदेच्या सुरक्षेचा भंग झाल्याबद्दल विरोधक गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. या गदारोळात अनेक खासदार सभापतींचा अपमान करताना दिसले. या कारणास्तव 41 खासदारांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. तर 8 खासदारांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. अशाप्रकारे एकूण 49 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.
काल ३३ खासदारांचे निलंबन केल्यानंतर आता पुन्हा तब्बल ४९ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. आज निलंबित केलेल्या खासदारांमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे , अमोल कोल्हे कॉंग्रेसचे शशी थरुर, मनिष तिवारी, डिंपल यादव, यांच्या नावाचा समावेश आहे.
दरम्यान, याआधीही संसदेच्या कामकाजात गोंधळ घातल्या प्रकरणी १९ आणि त्यानंतर ३३ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. आता पुन्हा ४९ खासदारांचे निलंबन झाल्याने कारवाईचा आकडा १४१ वर गेला आहे. देशाच्या इतिहासात लोकसभा आणि राज्यसभेतून एवढ्या मोठ्या संख्येने खासदार निलंबित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
Discussion about this post