यशवंतपूरहून गोरखपूरला जाणाऱ्या ट्रेनमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रेल्वे प्रवासादरम्यान खालेल्या अंडा बिर्याणीमुळे ४० पेक्षा अधिक प्रवाशांना विषबाधा झाला. विषबाधा झालेल्या प्रवाशांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या धक्कादायक प्रकारानंतर ही बिर्याणीची पार्सल कुठून घेण्यात आली, याबाबत रेल्वे प्रशासनाने चौकशी सुरु केली आहे.
याबाबत असं की, यशवंतपूरहून गोरखपूरला जाणाऱ्या 22534 एक्स्प्रेसमधील प्रवाशांना अंडा बिर्याणी खाणे चांगलेच महागात पडल्याचे समोर आले आहे. या प्रवाशांनी लोकांनी ट्रेनमध्ये धावणाऱ्या विक्रेत्यांकडून बिर्याणी आणि अंडी करी विकत घेऊन खाल्ली होती. त्यानंतर त्यांना पोटदुखी, उलट्या, जुलाबाचा त्रास जाणवू लागला. वेगवेगळ्या डब्यात बसलेल्या प्रवाशांना एकाचवेळी त्रास जाणवू लागल्याने एकच खळबळ उडाली.
या घटनेचे गांभीर्य ओळखून कानपूर रेल्वे स्थानकावर डॉक्टरांचे पथक ट्रेनमध्ये चढले. ज्यानंतर सर्व प्रवाशांवर उपचार सुरू करण्यात आले. रेल्वे प्रशासन, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आणि डॉक्टरांच्या टीमच्या मदतीने आजारी प्रवाशांवर उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले. सध्या या प्रवाशांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. या धक्कादायक प्रकारानंतर ही बिर्याणीची पार्सल कुठून घेण्यात आली, याबाबत रेल्वे प्रशासनाने चौकशी सुरु केली आहे. या चौकशीमध्ये नागपूर तसेच बल्लारशाह रेल्वे स्टेशनच्या जनआहार स्टॉलवरून ही बिर्याणीची पार्सल अनेक ठिकाणी ट्रेनमध्ये देण्यात आल्याचे समोर आले. याप्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून दोन्ही ठिकाणचे सँपल तपासणीसाठी नेण्यात आले आहेत.















Discussion about this post