नवी दिल्ली | लोकसभेचं हिवाळी सुरु असून या दरम्यान विविध मुद्द्यावर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. दरम्यान, यावेळी लोकसभेत कामकाज सुरू असताना गोंधळ घालणाऱ्या एकूण 33 खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे.
यातील अनेक खासदारांना संपूर्ण अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आलं आहे. लोकसभा अध्यक्षांनी ही सर्वात मोठी कारवाई केली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी निलंबित केलेल्या खासदारांमध्ये अधीर रंजन चौधरी, टीआर बालू, दयानिधी मारन यांचा समावेश आहे.
संसदेचं हिवााळी अधिवेशन सुरू आहे. आजही अधिवेशनात गोंधळ पाहायला मिळाला. आजही सभागृहात प्रचंड गोंधळ झाल्याने लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी 33 खासदारांना निलंबित केले आहे. लोकसभा अध्यक्षांचं विरोधी पक्षाचे खासदार ऐकतच नव्हते. त्यामुळे लोकसभा अध्यक्षांना कठोर पाऊल उचलावं लागलं आहे. शुक्रवारीच 13 खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर आज ही सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे.
काँग्रेस नेत्यांचाही समावेश
लोकसभा अध्यक्षांनी ज्या खासदारांना निलंबित केलं आहे. त्यात काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांचाही समावेश आहे. याशिवाय काँग्रेससह टीएमसी खासदारांनाही निलंबित करण्यात आलं आहे. दयानिधी मारन आणि सौगत राय यांनाही निलंबित करण्यात आलं आहे. आज निलंबित करण्यात आलेल्या अनेक खासदारांची नावे समोर आली आहेत.















Discussion about this post