जळगाव । गांधीधाम एक्स्प्रेसमधून पोलिस कर्मचाऱ्यांना रेल्वेच्या शौचालयात दोन बेवारस गोण्या आढळून आल्या होत्या. त्याची तपासणी केली असता त्यात २६ किलो गांजा आढळून आला असून त्याचे मूल्य २ लाख ६२ हजार रुपये इतके आहे.
रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी संजय पाटील आणि जितेंद्र इंगळे हे शुक्रवारी (त. २७) श्र्वानपथकासह गांधीधाम एक्स्प्रेस (२०८०३) मध्ये ड्यूटीवर असताना आचेगाव स्थानकावरून गाडी सुटताच श्र्वानाला (वीरू) उग्र वासामुळे कोच क्रमांक एस ९ च्या पुढच्या बाजूला वॉशरूममध्ये दोन बेवारस संशयास्पद गोण्या आढळून आल्या.
ही माहिती विभागीय सुरक्षा नियंत्रण कक्षामार्फत वरिष्ठांना कळवून या गोण्या भुसावळ फलाट क्रमांक चारवर उतरविण्यात येऊन सीसीटीव्हीच्या सर्व्हर रूममध्ये ठेवण्यात आल्या होत्या. या दोन्ही गोण्या नायब तहसीलदार, उपनिरीक्षक तसेच छायाचित्रकार यांच्या समक्ष उघडल्या असता त्यात १३ बंडल २६ किलो गांजा आढळून आला. गोण्यामधील १३ बंडल उघडले असता त्यामधून आंबट उग्रवास आणि त्यात बिया असलेला ओला गांजा दिसला. सदरील गांजाचे वजन २६.२५८ किलो असल्याचे आढळून आले. ज्याची अंदाजे एकूण किंमत २ लाख ६२ हजार ५८० रुपये एवढी आहे.