मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गाठला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याचं पाहायाला मिळाले. एकापाठोपाठ अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश घेतला. मात्र यावेळी ठाकरे गटाने एकनाथ शिंदेंना मोठा झटका दिला.
मुंबईतील पंचतारांकित कोर्टयाड मेरीट हॉटेलमधील २५० कर्मचारी सहा महिन्यांपूर्वी भारतीय कामगार सेनेला जय महाराष्ट्र करत त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कर्मचारी सेनेत प्रवेश केला होता.
मात्र, कामगारांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यामुळे कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे म्हणून पुन्हा ठाकरेंच्या भारतीय कामगार सेनेत प्रवेश केला आहे. विनायक राऊत, शैलेश परब आणि युनिट प्रमुख रुपेश कदम यांच्या नेतृत्वात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत २५० कर्मचाऱ्यांनी पुन्हा पक्षप्रवेश केला आहे.
Discussion about this post