विद्यार्थी तसेच पालकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. राज्यातील सर्व शाळा 25 सप्टेंबर रोजी बंद राहणार आहेत. यामागील कारण म्हणजे शिक्षक संच मान्यतेचा १५ मार्च २०२४ मध्ये आणि कंत्राटी शिक्षक भरतीचा शासन निर्णय ५ सप्टेंबर २०२४ रोजी काढण्यात आला होता.
शासनाचा हा निर्णय वाडीवस्तीवरील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असल्याने दोन्ही शासन निर्णय रद्द करावेत या मागणीसाठी राज्यातील सर्व प्राथमिक शाळा 25 सप्टेंबर रोजी बंद ठेवून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय पुणे येथे नुकत्याच झालेल्या राज्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे राज्यातील सर्व शाळा 25 सप्टेंबर रोजी बंद राहणार आहेत.
राज्यात सुधारीत शिक्षक संच मान्यता आणि कंत्राटी शिक्षक भरतीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. याला राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी कडाडून विरोध केलाय. ही अंमलबजावणी सुरू झाल्यास राज्याच्या ग्रामीण भागातील 1 लाख 85 हजार विद्यार्थी आणि 29 हजाराहून अधिक शिक्षकांचे भवितव्य अंधारात जाण्याची भीती व्यक्त होत आहे.















Discussion about this post