उत्तरखंडमधून बस अपघाताची मोठी घटना समोर आलीय. ज्यात ३५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली असून यात २५ जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. अपघाताची माहिती मिळताच बचाव पथकं आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सध्या बचावकार्य वेगाने सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अल्मोडामध्ये मार्चुला जवळ हा अपघात झाला. नैनी डांडा येथून बस रामनगरकडे जात होती. चालकाला अंदाज न आल्यामुळे सकाळी बस दरीत कोसळली. गीत जागीर नदीच्या किनाऱ्याला बस दरीत कोसळल्यामुळे अनेकजणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आलेय. ५ जणांच्या मृत्यूची अधिकृत माहिती समोर आलेली आहे. या अपघातामध्ये काहीजण जखमीही झाले आहेत.
#BreakingNews — उत्तराखंड के अल्मोड़ा में सड़क हादसा,खाई में गिरी बस .. #uttrakhand #almora pic.twitter.com/OLdBbLxK5p
— Rohit Chaudhary (@rohitch131298) November 4, 2024
४२ आसनी बसमध्ये ३५ पेक्षा अधिक प्रवासी होते. बस दरीत कोसळल्याची घटना सकाळी घडली. या अपघातानंतर काही प्रवासी स्वतः बसमधून बाहेर आले. काही लोक बिथरून खाली पडले. या अपघातमध्ये जखमी झालेल्या प्रवाशांनी या दुर्घटनेची माहिती दिली. सध्या घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.