सांगली | अजित पवारांनी बंड पुकारत शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली असून तेव्हापासून अजित पवार गटातील इन्कमिंग आद्यपही सुरूच आहे. अशातच आणखी एका बड्या नेत्याने राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे.
शरद पवार गटाचे नेते वैभव पाटील आणि माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. वैभव पाटील यांच्यावर अजित पवार गटाच्या सांगली जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, महिनाभरात दादा गटात इन्कमिंग वाढण्याचाही दावा या नेत्यांनी केला आहे. तसंच अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्याचा विकास सुरू आहे. अजिदादांचं नेतृत्व खंबीर आहे, त्यासाठी आपण अजित पवार यांच्यासोबत जात असल्याचं या नेत्यांनी म्हटलंय.
आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आता नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. पक्षाकडून पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना नक्की ताकद आणि पाठबळ मिळणार आहे, अशी भूमिका अजित पवार गटाचे नवनिर्वाचित सांगली जिल्हा अध्यक्ष वैभव पाटील यांनी मांडली आहे. सांगलीत झालेल्या पत्रकार परिषदेत शहर जिल्हा अध्यक्ष प्रा पद्माकर जगदाळे आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील बोलत होते.यावेळी माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी उघडपणे अजित पवार गटात प्रवेश केला आहे.
Discussion about this post