पुणे । राज्यातील अनेक ठिकाणी चोरटयांनी धुमाकूळ घातला असून यामुळे चोरट्यांना खाकीचा धाकच शिल्लक नसल्याचं दिसून येते.दरम्यान चोरटयांनी भरवस्तीत असलेल्या एसबीआय बँकेचे एटीएम मशीन गॅस कटरच्या सहाय्याने फोडून यातील तब्बल १६ लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना पुण्यातील शिक्रापूर येथील सणसवाडी परिसरात घडली. यामुळे परिवारात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे.
मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. घरफोडी करण्यासोबत चोरट्यांकडून एटीएम मशीन देखील टार्गेट करण्यात येत आहेत. गॅस कटरच्या सहाय्याने मशीन कापण्यात येत असते. तर बऱ्याचदा थेट मशीनचा घेऊन पसार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यानुसार पुण्याच्या शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येते रात्रीच्या सुमारास स्टेट बँकेचे एटीएम फोडल्याची घटना घडली आहे.
शिक्रापूर येथे वस्ती असलेल्या भागात एसबीआयचे एटीएम आहे. रात्री उशिरा भर लोकवस्तीच्या ठिकाणी एटीएमवर दरोडा टाकण्यात आला आहे. याठिकाणी चोरट्यानी आतमध्ये प्रवेश करत एटीएम मशीनचा पत्रा गॅस कटरच्या सहाय्याने कापून टाकला. यानंतर यातिल १६ लाख रुपयांची रक्कम घेऊन चोरटे पसार झाले होते. दरम्यान गॅस कटरचा वापर केल्याने एटीएम मशीन संपूर्ण पाने जळाले आहे.
दरम्यान एटीएम मशीनमध्ये दरोडा टाकण्यात आल्याचा प्रकार सकाळी परिसरातील नागरिकांच्या लक्षात आला. यानंतर नागरिकांनी या घटनेबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. शिक्रापूर पोलीसांकडुन तपास सुरु करण्यात आला असून एटीएमच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरातील फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरु आहे. मात्र भर वस्तीत चोरट्यांनी एटीएम लक्ष केले असल्याने एटीएमच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्नचिन्ह उभे केले आहेत.
Discussion about this post