जळगाव । चेहरा झाकून आलेल्या चार चोरट्यांनी सोने कारागिरांच्या इमारतीतील दोन दुकाने फोडत कारागिरांना चाकू लावून २५१ ग्रॅम वजनाचे आजच्या बाजारभावाने सुमारे १६ लाखांचे सोने लांबवले. ही घटना जळगाव शहरातील रथ चौक ते पांजरपोळ दरम्यान दाट वस्तीतील सीताराम प्लाझा अपार्टमेंटमध्ये घडली. मोठ्या या इमारतीत ४५ सोने कारागिरांची दुकाने असताना सुरक्षारक्षक नाही. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
मध्यरात्री दोन दुकाने फोडली
सचिन प्रकाश सोनार (38, रामपेठ, जळगाव) हे कुटुंबासह वास्तव्याला आहेत. त्यांचे मारुतीपेठ येथे अलंकार नावाचे दागिने बनवण्याचे दुकान आहे. त्याच्या बाजूला नूर पॉलिश सेंटर नावाचे देखील पॉलिश मारण्याचे दुकान आहे. शुक्रवार, 26 जानेवारी रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दोन्ही दुकान फोडून दोन्ही दुकानातून एकूण 14 लाख 59 हजार रुपये किंमतीचे 251 ग्रॅम सोन्याचे मटेरीयल लांबवण्यात आले. हा प्रकार पहाटे चार वाजेच्या सुमारास उघडकीला आला.
दरम्यान, सचिन सोनार यांनी शनिपेठ पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रिया दातीर करीत आहे.
Discussion about this post