उत्तर प्रदेशातील कासगंज येथून एक भीषण दुर्घटना समोर आली आहे. ज्यामध्ये 15 जणांना आपला जीव गमवावा लागल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माघ पौर्णिमेनिमित्त काही भाविक ट्रॅक्टर-ट्रॉलीतून गंगेत स्नान करण्यासाठी जात होते. त्यानंतर ट्रॅक्टर-ट्रॉलीचा ताबा सुटून ती तलावात उलटली. ज्यामध्ये आठ मुलांसह 15 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये ७ महिलांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. यात अनेक गंभीर जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डीएम, एसपी आणि इतर प्रशासकीय आणि पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. मदत आणि बचावकार्य सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यावर कार वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर ट्रॅक्टर-ट्रॉली पाण्याने भरलेल्या तलावात जाऊन उलटली. शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास पटियाली-दरियावगंज रस्त्यावर हा अपघात झाला.
तलावात ट्रॅक्टर-ट्रॉली उलटल्याने एकच आरोडओरड सुरु झाला. हे ऐकून आजूबाजूच्या लोकांनी तलावाकडे धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले. मात्र जोपर्यंत तलावात अडकलेल्या लोकांना बाहेर काढता आले तोपर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातात अनेक जण जखमीही झाले आहेत. ज्यांना कासगंजच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सीएम योगींनी भरपाई जाहीर केली
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कासगंज येथील अपघातावर शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी संवेदनाही व्यक्त केल्या. सीएम योगी यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 2-2 लाख रुपये आणि जखमींना 50-50 हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. तसेच, कासगंज जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना अपघातात जखमी झालेल्या लोकांवर तातडीने आणि पुरेसे उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Discussion about this post