नवी दिल्ली । वायू प्रदूषण हे जगातील अनेक देशांसमोरील सर्वात मोठ्या समस्यांपैकी एक आहे. भारतही या समस्येशी मुकाबला करत असतानाच आता भारतीयांची आणखी चिंता वाढवणारी माहीती समोर आली. जगातील २० सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी १३ शहरे भारतातील असल्याची माहिती समोर आली आहे. स्विस एअर क्वालिटी टेक्नॉलॉजी कंपनी ‘आयक्यूएअर’ने जारी केलेल्या वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्टमधून समोर आली आहे.
स्विस एअर क्वालिटी टेक्नॉलॉजी कंपनी आयक्यूएअरने जारी केलेल्या वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्टनुसार, २०२४ मध्ये दिल्ली ही जागतिक स्तरावर सर्वात प्रदूषित राजधानी आहे.
जगातील टॉप २० प्रदूषित शहरांपैकी १३ शहरं ही भारतात आहेत. ज्यात बर्निहाट, दिल्ली, मुल्लापूर, फरिदाबाद, लोणी, नवी दिल्ली, गुरगाव, गंगानगर, ग्रेटर नोएडा, भिवाडी, मुझफ्फरनगर, हनुमानगड आणि नोएडा यांचा समावेश आहे.
प्रदूषणामुळे आरोग्याला गंभीर धोका
भारतात वायू प्रदूषणामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होतात. ज्यामुळे आपलं आयुष्य ५.२ वर्षांनी कमी होऊ शकतं. गेल्या वर्षी प्रकाशित झालेल्या लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ अभ्यासानुसार, २००९ ते २०१९ पर्यंत, भारतात दरवर्षी प्रदूषणामुळे सुमारे १५ लाख नागरीकांचा मृत्यू झाला आहे.
Discussion about this post