जळगाव । जळगाव शहरातील विद्यानगर येथे घरामध्ये लावलेल्या दोरखंडाशी खेळताना अचानक गळफास लागून १२ वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. हार्दीक प्रदीपकुमार अहिरे असं मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील विद्यानगर येथे घरात लावलेल्या दोरखंडाशी खेळत असताना गळफास लागून हार्दीकचा मृत्यू झाला. हार्दीक शाळेतून घरी आल्यानंतर शेजारच्या घरी खेळायला गेला होता. त्या ठिकाणी बांधलेल्या दोरखंडाशी खेळत असताना हार्दीकच्या गळ्याला दोरखंडाचा फास लागला आणि त्याचा मृत्यू झाला.हार्दीकची आई त्याच्या लहान भावाला ट्यूशनला सोडवण्यासाठी गेली होती. घरात कुणी नसल्यामुळे हार्दीक शेजारच्या घरी खेळण्यासाठई गेला. त्याठिकाणी बांधलेल्या दोरखंडाशी तो खेळत होता. खेळताना त्याच्या गळ्याला फास लागला. ज्या घरामध्ये तो खेळत होता त्या घरातील महिलेच्या लक्षात येताच तिने आरडाओरडा केला. सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली हार्दीक बेशुद्धावस्थेत पडला होता.
त्यानंतर हार्दीकला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. पण तोपर्यंत उशिर झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करण्यात आले. २०१५ मध्ये हार्दीकला अहिरे कुटुंबीयांना दत्तक घेतला होता. हार्दिक हा ९ महिन्याचा असताना त्याला पुण्याच्या एका संस्थेतून दत्तक घेण्यात आले होते. त्याच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे पालकांनी टाहो फोडला.
Discussion about this post