आपण कोबरा या महाकाय सापाबद्दल ऐकतो तेव्हा अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. हाच धोकादायक साप तुमच्या अंगात किंवा घराबाहेर असलेल्या बागेत आढळला तर?मात्र असाच एक धक्कादायक प्रकार कर्नाटकात आढळून आलेला आहे.
कर्नाटकात एक व्यक्ती घराबाहेर पडला असता घराजवळ असलेल्या एका झाडाच्या फांदीवर त्याला एक महाकाय असा कोबरा दिसून येतो. सध्या या कोबराचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेली घटना कर्नाटकातील अगुंबे परिसरातील आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की, एका झाडाच्या फांदीला वेटोळे घालून एक महाकाय कोबरा बसलेला आहे. साधारण पाहिले तर हा कोबरा १२ ते १३ फूट लांबीचा असलेला दिसून येतो. परंतू तुम्ही सुरुवातील व्हिडिओ पाहिला तर असे वाटते की एक पाईप झाडाच्या फांदीला लावलेली आहे.
परंतू जसा व्हिडिओ पुढे जातो आणि तुम्हीही तो नीट पाहता तर शिकारासाठी बसलेला कोबरा तुम्हाला दिसले. त्यानंतर व्हिडिओ दिसते की, वनविभागाच्या काही सहकार्यांच्या मदतीने झाडावर बसलेल्या कोबराला पकडण्यात यश येते. मग वनविभागाने कोबरा या सापाला एका पिशवीत भरतात आणि जंगलात सोडून देतात.















Discussion about this post