मुंबई । जेव्हा तुम्ही एटीएममधून पैसे काढायला जाता तेव्हा अनेकदा असे घडते की फक्त ५०० रुपयांच्या नोटा बाहेर येतात. या नोट्स घेतल्यानंतर, तुम्हाला अनेकदा सुट्टे पैशांसाठी इकडे तिकडे भटकावे लागते. पण आता हे होणार नाही. कारण भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) एटीएममध्ये १०० आणि २०० रुपयांच्या नोटा जास्त ठेवण्याचे निर्देश सर्व बँका आणि एटीएम ऑपरेटर्संना दिले आहेत.
रिझर्व्ह बँकेने निर्देश दिले आहेत. यामुळे एटीएममधून आता तुम्हाला १०० आणि २०० रुपयांच्या जास्तीत जास्त नोटा मिळणार आहे. या निर्णयाने बँकांचे लक्ष वेधले आहेत. आरबीआयने आपल्या निर्देशात म्हटलंय की, सर्वसामान्या नागरिकांना नोट उपलब्ध व्हाव्यात यासाठी हे करणे गरजेचे आहे. एटीएममधून १००,२०० रुपयांच्या नोटा उपलब्ध व्हायला हव्यात.
रिझर्व्ह बँकेने काय सांगितलं?
रिझर्व्ह बँकेने सर्व बँका आणि व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर्संना सांगितले की, याची टप्प्याटप्प्याने अंबलबजावणी व्हायला हवी. व्हाईल लेबल एटीएम हे सरकारी आणि खाजगी बँकांसारखेच काम करतात. आरबीआयच्या या निर्णयाची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, असंही सांगण्यात आले आहे.
रिझर्व्ह बँकेने सांगितले की, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत एटीएमपैकी ७५ टक्के एटीएममध्ये एक कॅसेट ही १०० किंवा २०० रुपयांच्या नोटांनी भरलेली असावी. एका कॅसेटमध्ये २५०० नोटा असतात. ही एक पेटी १००-२०० रुपयांच्या नोटांची असणे अनिवार्य आहे. एका एटीएममध्ये चार किंवा ६ कॅसेट असतात. ३१ मार्च २०२६ पर्यंत ९० टक्के एटीएममध्ये १कॅसेट १००,२०० रुपयांच्या नोटांची असावी, असं आरबीआयने सांगितले आहे.
Discussion about this post