धुळे । राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या २८८ मतदारसंघांसाठी मतदान होत आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान करता येईल. दरम्यान मतदानाच्या दिवशी धुळ्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे.
धुळ्यात 10 हजार किलोच्या चांदीच्या विटा जप्त करण्यात आल्या आहेत. धुळे पोलिसांकडून एकूण 94 कोटी 68 लाख रुपयांच्या विटा जप्त करण्यात आल्या असून ती चांदी एचडीएफसी बँकेची असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
Discussion about this post