चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील एका गावात भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. विवाहित महिलेला धमकी देत तिचा विनयभंग केल्याची प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे माझ्यासोबत शरीरसंबंध ठेवले नाही तर मी तुझ्या नावाने चिठ्ठी लिहून जीवाचे बरे वाईट करुन घेईन. नाहीतर तुझ्या मुलांना मारुन टाकेन; अशी धमकी दिली . सततच्या त्रासाला कंटाळून २१ मेस विवाहितेने चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यावरून एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील एका गावात विवाहिता पती व मुलांसह वास्तव्यास आहे. दरम्यान ३० एप्रिलला विवाहिता घरी असताना सकाळी दहा वाजेच्या सुमारास विजय रघुनाथ बोरसे हा तिच्या घरी आला. विवाहितेला उद्देशून तू मला आवडतेस, तू माझ्यासोबत शरीरसंबंध ठेव, अशी मागणी विवाहितेकडे करत तिला लज्जा उत्पन्न होईल अशी भाषा वापरली. तसेच तू जर माझ्यासोबत शरीर संबंध ठेवले नाही तर, मी माझ्या जीवाचे बरे वाईट करने; अशी धमकीही विजयने विवाहितेला दिली.
या प्रकारानंतर ११ मेस विजय हा पुन्हा विवाहितेच्या घरी आला. यावेळीही त्याने विवाहितेकडे शरीरसुखाची मागणी करत आत्महत्या करण्याची धमकी दिली. तसेच त्याने विवाहितेला तुझ्या मुलांना मारुन टाकेन अशीही धमकी दिली. यावेळी विवाहितेचे पती यांनी विजय रघुनाथ बोरसे याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, विजयने विवाहितेच्या पतीलाही धमकी देत तुझ्या पत्नीस पळवून नेईल, तू काहीच करु शकत नाही अशी धमकी दिली. या प्रकारामुळे विवाहितेसह संपूर्ण कुटुंब तणावात आले.
विजय बोरसे याच्या सततच्या त्रासाला कंटाळून २१ मेस विवाहितेने चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरुन विजय रघुनाथ बोरसे याच्या विरोधात विनयभंग केल्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय महाजन हे करत आहेत.
Discussion about this post