मुंबई : उन्हाळा म्हटलं की अंगावरून घामाच्या धारा वाहू लागतात. उन्हाळ्यात तापमानाचा पारा नवनवीन रेकॉर्ड करताना पाहायला मिळतंय. सध्या उन्हाळा हा चांगलाच त्रासदायक ठरतो. मात्र येत्या पुढील पाच वर्षात मानवाला पृथ्वीवर राहणं कठीण होणार आहे.
यामागचं कारण म्हणजे पृथ्वीचं तापमान वाढणार असल्यासंदर्भात जागतिक हवामान संघटनेने (WMO) बुधवारी एक धक्कदायक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात म्हटलं गेलं आहे की येत्या पाच वर्षात संपूर्ण जगाचे सरासरी तापमान १.५ अंश सेल्सिअसने वाढेल. यामुळे मोठ्या प्रमाणात उष्णताही वाढणार आहे.
डब्लूएमओने (WMO) ३० वर्षांच्या सरासरी जागतिक तापमानाच्या आधारे हा खुलासा केला आहे. २०२७ पर्यंत जगाचे तापमान दीड अंश सेल्सिअसने वाढणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे. याची ६६ टक्के शक्यता असल्याचंही संघटनेने म्हटलं आहे.
गेल्या वर्षी आलेल्या अहवालात याची शक्यता ५०-५० होती. पण पुन्हा केलेल्या अभ्यासानुसार आता ही शक्यता ६६ टक्के इतकी झाली आहे. ज्या भयानक अहवालात ही गोष्ट उघड झाली आहे, त्याला ‘ग्लोबल अॅन्युअल टू डेकॅडल क्लायमेट अपडेट’, असे नाव देण्यात आले आहे.
दर पाच वर्षांतील एक वर्ष अत्यंत उष्ण असतो
डब्लूएमओनेने आणखी एक चिंताजनक इशारा जारी केला आहे. ज्यामध्ये पुढील पाच वर्षांत विक्रमी उष्माघात होण्याची ९८ टक्के शक्यता असल्याचे म्हटले आहे. वर्ष २०१६ पासून ही प्रक्रिया सुरू झाली आहे. हे एक मोठे हवामान संकट आहे, ज्याला बहुतेक देश गांभीर्याने घेत नाहीत, असं डब्लूएमओचं म्हणणं आहे.
Discussion about this post