मुंबई : तुम्हीही नवीन स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आलेली आहे. Redmi ने काही दिवसापूर्वीच Redmi A2 सिरीज लॉन्च केली आहे. ज्याची विक्री आज म्हणजेच 23 मे 2023 पासून सुरू होईल.रेडमीचा स्मार्टफोन फक्त 5,999 मध्ये खरेदी करू शकता. Redmi A2 सीरिजने समाविष्ट केलेले Redmi A2 आणि Redmi A2 Plus स्मार्टफोन Amazon द्वारे खरेदीसाठी उपलब्ध करून दिले जातील
Redmi A2 सीरिजची भारतात किंमत
Redmi A2 चे 3 स्टोरेज प्रकार 10 हजारांपेक्षा कमी किमतीत येतात. त्याच्या 2GB रॅम + 32GB स्टोरेजची किंमत 5,999 रुपये, 2GB + 64GB ची किंमत 6,499 रुपये आणि 4GB + 64GB ची किंमत 7,499 रुपये आहे.
Redmi A2+ चे सिंगल व्हेरिएंट 4GB + 64GB आहे, ज्याची किंमत 8,499 रुपये आहे. फोनमध्ये सी ग्रीन, एक्वा ब्लू आणि क्लासिक ब्लॅक असे तीन रंग पर्याय आहेत.
Redmi A2 सीरिज
Redmi A2 आणि Redmi A2 Plus ची भारतात विक्री 23 मे 2023 पासून सुरू होईल. Mi.com आणि Amazon च्या वेबसाइटवरून हा फोन खरेदी करता येईल. यावर बँक ऑफर दिली जाईल. ICICI बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डने पैसे भरून 500 रुपयांची झटपट सूट मिळू शकते.
Redmi A2 स्पेसिफिकेशन
Redmi A2 मध्ये 1,600 x 720-पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.52-इंचाचा LCD डिस्प्ले आहे. हा फोन MediaTek Helio G36 चिपसेटने चालतो. हा फोन Android 12 (Go Edition) आउट ऑफ द बॉक्सवर काम करतो. यात 1 LED फ्लॅश, 8MP सेन्सर आणि QVGA कॅमेरासह ड्युअल रियर कॅमेरा आहे. फोनमध्ये 5MP फ्रंट कॅमेरा आहे.
Redmi A2 Plus स्पेसिफिकेशन
Redmi A2+ मध्ये 120Hz टच सॅम्पलिंग रेटसह 6.52-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. हा फोन MediaTek Helio G36 चिपसेटने चालतो. यात 8MP प्राथमिक कॅमेरासह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. त्याच्या फ्रंटला 5MP सेल्फी कॅमेरा देखील आहे. फोनमध्ये 5,000 mAh ची बॅटरी आहे.
Discussion about this post