मुंबई : राज्यात सत्तांतरण झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार विराजमान झाले होते. या सरकारचा पहिला विस्तार पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता.मात्र आता रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख समोर आलेली आहे. सोबतच संभाव्य मंत्र्यांची नावे देखील समोर आली असून त्यात एरंडोलचे आमदार चिमणराव पाटील यांचा समावेश आहे.
सर्वोच्च न्यायालयात असणाऱ्या याचिकेमुळे विस्तार रखडला होता. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. त्यात शिंदे सरकारला दिलासा मिळाला. यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु झाली होती. आता विस्ताराचा निर्णय झाला आहे. रखडलेल्या मंत्रि मंडळाचा विस्तार हा २३ किंवा २४ मे ला घेण्याची चर्चा दबक्या आवाजाने आमदारांमध्ये सुरू आहे.
या मंत्रिमंडळ विस्तारात भरत गोगवले( जलसंधारण मंत्री), संजय शिरसाठ (परिवहन किंवा समाज कल्याण) बच्चू कडू (दिव्यांग मंत्री)प्रताप सरनाईक , सदा सरवणकर, यामिनी जाधव, अनिल बाबर, चिमन आबा पाटील या आमदारांची वर्णी लागण्याचीही चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाल्याचे बोलले जात आहे
Discussion about this post